मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" 2025-26 जाहीर ..

 

तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" 2025-26 जाहीर करण्यात आला आहे.

त्यानुसार या कार्यक्रमात 60 फेलोंची निवड करण्यात येणार आहे.


फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला व यशस्वीपणे राबवण्यात आला. त्यानंतर 2023-24 या कालावधीतील कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्या नंतर आता 2025-26 साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


अर्ज करण्यासाठी अटी


फेलोंच्या निवडीचे निकष : अर्जदार भारताचा नागरिक असावा.


शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 60 % गुण आवश्यक) असावा.


अनुभव : किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.


भाषा व संगणक ज्ञान: मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

भाषा व संगणक ज्ञान: मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान 21 वर्षे व कमाल 26 वर्षे असावे.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईनअॅप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क किती?

अर्जाकरिता शुल्क 500 रुपये असतील. या कार्यक्रमात फेलोंची संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या 1/3 राहील. 1/3 महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.

निवड प्रक्रिया कशी असेल?


फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा Online (Objective Test) द्यावी लागेल.

ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या

 mahades.maharashtra.gov.in 

या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील. यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील.


वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या सुमारे 210 उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरील निबंध विहीत तारखेस विहीत वेळेत ऑनलाईन पध्दतीने सादर करावा लागेल. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 210 उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल.


निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक 20 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद यांच्या अधिनस्त काम पाहतील. फेलोंची नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजु झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.


या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये 56,100 व प्रवासखर्च रुपये 5400 असे एकत्रित 61,500 रुपये देण्यात येतील.शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिपचा अविभाज्य भाग असेल. निवड झालेल्या फेलोंसाठी आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल.


या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करताना फेलोंना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर ऑफलाईन व ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जाईल. ऑफलाईन व्याख्याने फेलोशिपच्या सुरुवातीस दोन आठवडे तसेच सहा महिन्यानंतर व शेवटी प्रत्येकी एक आठवडा, आयआयटी, मुंबई येथे आयोजित करण्यात येतील. याव्यतिरीक्त ऑनलाईन व्याख्याने वर्षभरात कार्यक्रमाच्या गरजेनुसार शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी आयोजित करण्यात येतील. ऑफलाईन व ऑनलाईन सर्व व्याख्यानांना उपस्थित रहाणे फेलोंना अनिवार्य आहे. या कार्यक्रमाचा उद्देश फेलॉना सार्वजनिक हितासाठी काम करताना व धोरण निर्मिती करताना योग्यसाधने व शास्त्रीय पध्दींचा वापर करण्यासाठी मदत करणे तसेच विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये व क्षमता वाढविणे हा असेल.


सदर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोंना संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल. शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यालय वा प्राधिकरणासोबत फेलोंनी करावयाचे काम (फील्ड वर्क) व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील. शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त परिचय सत्र, विविध सामाजिक संस्थांना भेटी, मान्यवर व्यक्तींशी संवाद, प्रमाणपत्र प्रदान या उद्देशाने वर्षभरात इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.


राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात 1991-92 मध्ये झाली. हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. भारत सरकारचा 'क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय' हा पुरस्कार देतो.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराविषयी काही महत्त्वाची माहिती:

 * उद्देश: ज्या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने क्रीडा क्षेत्रात योगदान दिले आहे आणि सक्रिय क्रीडा कारकीर्दीतून निवृत्त झाल्यानंतरही खेळांना प्रोत्साहन देण्यास योगदान देत आहेत, अशा खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

 * पुरस्कार रक्कम: या पुरस्काराच्या विजेत्याला 7.5 लाख रुपये पुरस्कार रक्कम म्हणून मिळतात.

 * पुरस्कार देण्याची प्रक्रिया: हा पुरस्कार दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींद्वारे प्रदान केला जातो.

 * पहिला पुरस्कार: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जिंकणारे पहिले व्यक्ती विश्वनाथन आनंद होते.

 * नाव बदलणे: ऑगस्ट 2021 मध्ये, मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आले.

राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे (आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार) विजेते खालीलप्रमाणे आहेत:

 * विश्वनाथन आनंद (1991-92): बुद्धिबळ

 * गीत सेठी (1992-93): बिलियर्ड्स

 * होमी मोतीवाला आणि पी.के. गर्ग (1993-94): नौकानयन

 * कर्णम मल्लेश्वरी (1994-95): भारोत्तोलन

 * कुंजराणी देवी (1995-96): भारोत्तोलन

 * लिएंडर पेस (1996-97): टेनिस

 * सचिन तेंडुलकर (1997-98): क्रिकेट

 * धनराज पिल्ले (1999-2000): हॉकी

 * पी. गोपीचंद (2000-01): बॅडमिंटन

 * अभिनव बिंद्रा (2001-02): नेमबाजी

 * अंजली भागवत (2002-03): नेमबाजी

 * के.एम. बीनमोल (2002-03): ऍथलेटिक्स

 * अंजू बॉबी जॉर्ज (2003-04): ऍथलेटिक्स

 * राज्यवर्धन सिंग राठोड (2004-05): नेमबाजी

 * पंकज अडवाणी (2005-06): बिलियर्ड्स

 * मानवजित सिंग संधू (2006-07): नेमबाजी

 * महेंद्रसिंग धोनी (2007-08): क्रिकेट

 * एम.सी. मेरी कोम (2009): बॉक्सिंग

 * विजेंदर सिंग (2009): बॉक्सिंग

 * सुशील कुमार (2009): कुस्ती

 * सायना नेहवाल (2009-10): बॅडमिंटन

 * गगन नारंग (2010-11): नेमबाजी

 * विजय कुमार (2011-12): नेमबाजी

 * योगेश्वर दत्त (2011-12): कुस्ती

 * रंजन सोढी (2012-13): नेमबाजी

 * सानिया मिर्झा (2015): टेनिस

 * पी.व्ही. सिंधू (2016): बॅडमिंटन

 * देवेंद्र झाझरिया (2017): पॅरा ऍथलेटिक्स

 * सरदार सिंग (2017): हॉकी

 * विराट कोहली (2018): क्रिकेट

 * मीराबाई चानू (2018): वेटलिफ्टिंग

 * बजरंग पुनिया (2019): कुस्ती

 * दीपा मलिक (2019): पॅरा ऍथलेटिक्स

 * रोहित शर्मा (2020): क्रिकेट

 * मरियप्पन थंगावेलू (2020): पॅरा ऍथलेटिक्स

 * मनिका बत्रा (2020): टेबल टेनिस

 * विनेश फोगट (2020): कुस्ती

 * राणी रामपाल (2020): हॉकी

 * निरज चोप्रा (2021): ऍथलेटिक्स

 * रवि कुमार (2021): कुस्ती

 * लवलीना बोरगोहेन (2021): बॉक्सिंग

 * श्रीजेश पी आर (2021): हॉकी

 * सुनील छेत्री (2021): फुटबॉल

 * मिताली राज (2021): क्रिकेट

 * प्रमोद भगत (2021): पॅरा बॅडमिंटन

 * सुमित अंतिल (2021): पॅरा ऍथलेटिक्स

 * अवनी लेखरा (2021): पॅरा नेमबाजी

 * कृष्णा नागर (2021): 

पॅरा बॅडमिंटन

 * मनीष नरवाल (2021): पॅरा नेमबाजी


Railway Recruitment Boards (RRBs) job 2025


Government of India Ministry of Railways

Railway Recruitment Boards (RRBs)

Recruitment of Assistant Loco Pilot (ALP) Indicative Notice

Applications are invited from the eligible candidates for the post of Assistant Loco Pilot given in the table below. Applications must be submitted ONLY THROUGH ONLINE MODE.

Tentative opening date of Application: 10-April-2025

Tentative Closing date for submission of Application: 09-May-2025 (23:59 hours)







 

लोकसभा.. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह

 लोकसभा, ज्याला लोकांचे सभागृह असेही म्हणतात, हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

  • सदस्य संख्या:
    • लोकसभेची कमाल सदस्य संख्या ५५० आहे.
    • सध्या लोकसभेत ५४३ सदस्य आहेत.
    • यातील ५४३ सदस्य थेट जनतेतून निवडले जातात.
  • सदस्यांचा कार्यकाळ:
    • लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
    • राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार मुदतीआधी लोकसभा विसर्जित करू शकतात.
  • अध्यक्ष:
    • लोकसभेचे कामकाज लोकसभेचे अध्यक्ष पाहतात.
    • लोकसभेचे सदस्य आपल्यामधून अध्यक्षाची निवड करतात.
  • लोकसभेचे महत्त्व:
    • लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे.
    • कायदे बनवण्यामध्ये लोकसभेचा महत्त्वाचा वाटा असतो.
    • सरकारवर नियंत्रण ठेवण्याचे काम लोकसभा करते.
    • अर्थविषयक विधेयके लोकसभेतच मांडली जातात.
  • कार्य:
    • कायदे बनवणे.
    • सरकारवर नियंत्रण ठेवणे.
    • अर्थविषयक बाबींवर नियंत्रण ठेवणे.
    • जनतेच्या समस्या मांडणे.

लोकसभा हे भारतीय लोकशाहीतील एक महत्त्वाचे सभागृह आहे.


लोकसभेविषयी आणखी माहिती:

  • लोकसभेची रचना:
    • लोकसभेची रचना भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ८१ मध्ये दिलेली आहे.
    • लोकसभेची कमाल सदस्य संख्या ५५० आहे.
    • सध्या लोकसभेत ५४३ सदस्य आहेत.
    • यातील ५४३ सदस्य थेट जनतेतून निवडले जातात.
  • लोकसभेचे अधिकार:
    • कायदे बनवणे: लोकसभा हे देशासाठी कायदे बनवते.
    • अर्थविषयक अधिकार: अर्थविषयक विधेयके लोकसभेतच मांडली जातात.
    • सरकारवर नियंत्रण: लोकसभा सरकारवर नियंत्रण ठेवते.
    • प्रश्नोत्तर तास आणि चर्चा: लोकसभेत प्रश्नोत्तर तास आणि विविध विषयांवर चर्चा होते.
  • लोकसभेतील कामकाज:
    • लोकसभेचे कामकाज लोकसभेचे अध्यक्ष पाहतात.
    • लोकसभेचे सदस्य आपल्यामधून अध्यक्षाची निवड करतात.
    • लोकसभेचे कामकाज संसदेच्या नियमांनुसार चालते.
    • लोकसभेमध्ये विविध प्रकारची विधेयके मांडली जातात व त्यावर चर्चा होऊन मतदान होते.
  • लोकसभेचे महत्त्व:
    • लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे.
    • लोकसभेमुळे जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचतात.
    • लोकसभेमुळे सरकार जनतेला जबाबदार राहते.



मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" 2025-26 जाहीर ..

  तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्...